ऑनलाइन कामातून निर्माण झालेला प्रश्न ; शिकायचे कसे? सध्या शिक्षक हे व्यक्तीमत्व गुलाम असल्यागत शाळेत काम करीत आहे. असं जाणवत आहे की त्याचं मुलभूत स्वातंत्र्यच सरकारनं हिरावून घेतला की काय? एवढी कामं त्या शिक्षकाच्या मागे आज लागून आहेत. दररोज एक ना एक काम येत असतेच. ज्यानं शिक्षकांचं जगणंच हराम करुन टाकलं आहे. अशीच एक बातमी. नागपुरातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी. शिक्षक नसतील तर शिकायचे कसे? अशा स्वरुपाचं जिल्हापरीषदेतील विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना लिहिलेले पत्र. विद्यार्थ्यांच्या मनपटलातून उमटलेला सुर. हा सुर त्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनपटलावर उमटलेला नाही तर तो सुर सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांचा आहे. परंतु ते बोलणार कसे? त्यांचं