भ्रमंती सिंधुदुर्गाची - 2

  • 528
  • 204

भ्रमंती सिंधुदुर्गाची२ कविलगाव ते वालावल खाडी दुपार टळून गेली होती.सव्वा तीनला घरातून बाहेर पडलो.कुठे जायचे ठरले ते नव्हते.मनाला ओढ होती भटकण्याची.सरळ कुडाळच्या रस्ता पकडला.कविलगावच्या साईबाबांच्या मंदिराबद्दल ऐकले होते पण जायचा योग आला नव्हता. भारतातलेच नव्हे तर संपूर्ण जगातले पहिले साई मंदिर आपल्या सिंधुदुर्गात असूनही आपण  ते बघितलं नाही ही थोडी लाजीरवाणी गोष्ट होती.कुडाळ रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे कुठेतरी ते आहे एवडच माहित होते. गाडी वळवली रेल्वे स्टेशन गाठले. डावीकडून एक रस्ता जातो तिथून उजवीकडे वळलो.रेल्वेब्रीज ओलांडले.तिथेच एक आडवा रस्ता जात होता. नेमकं डावा रस्ता पकडायचा की उजवीकडचा  या संभ्रमात होतो तेवढ्यात एक गुराखी दिसला." कविलगाव ?"" उजव्या बाजूनं वळा...थोडा अंतर गेलास काय मग