प्रकरण ६ : सावल्या अंधारातल्या सरलाच्या घरात अंधार होता. चेतन तिच्या मृतदेहाशेजारी उभा राहून मिळालेल्या चावीचा विचार करत होता . बाहेर तीन सावल्या हळूहळू घराच्या दिशेने येत होत्या. त्यांचे पायऱ्यांवर पडणारे आवाज शांत रस्त्यावर स्पष्ट ऐकू येत होते . " हे लोक कोण असावेत ? " चेतन मनात विचार करत होता . " श्यामने पाठवलेले माणसं, की पोलिस ? " कोणताही अंदाज घेण्याआधीच दार धाडकन उघडलं ! " तुम्ही कोण ? " चेतनने सावध आवाजात विचारलं . तिघांपैकी एक जण पुढे आला . उजव्या हातात त्याच्या एक लोखंडी रॉड चमकत होती. "चेतन, आम्हाला माहीत आहेस तू कोण