बी. एड्. फिजीकल भाग १७प्रा.गोंदकरांचा रोल पूर्वनियोजीतच होता. याबरोबर खेळ संपवून जादुगार नी चमुरा सामान पोतडीत भरून जायला लागल्यावरजाधव म्हणतो, “ये चमुऱ्या तुज्या वस्तादालासांगून माजं हात मोकळ कर गड्या .... उद्या उत्कर्षमदी माजा ल्येसन हाय..... तितं फळ्यावर लिवू कसं? खोटं वाटत आशेल तर प्रिंशीपाल सायबास्नी इचार.....” ह्या डायलॉगवर प्राध्यापकानी उभं राहूनटाळ्या वाजवल्या. ही अॅडिशन जाधवने आयत्यावेळी स्वत: घेतलेली होती.नंतर झालेली अंकांचीगंमतगाणीही सर्वाना आवडली. मग गुजराती मुलीनी दहाचा पाढा गुजरातीतून, हिंदीतून वेगवेगळ्या हिंदी गाण्यांच्या चालीत म्हणून शेवटी मराठीत मंगलाष्टकाच्या चालीत म्हणून एकमेकींच्या गळ्यात माळा घातल्या. शेवटी कार्यक्रम संपताना प्राचार्यानी जादुगार चमुऱ्याची मिमिक्री पुन्हा सादर करायला सांगितली.कार्यक्रमाच्या शेवटी ‘वी शॅल ओव्हरकम’गीतप्राचार्यानीसगळ्या वर्गाकडून