बी.एड्. फिजीकल - 16

  • 549
  • 1
  • 159

बी. एड्. फिजीकल  भाग १६मराठी मेथडचा गट माझ्याशी आदराने वागायचा. हा या गटात  तीस  प्रशिक्षणार्थी  होते. रोज सरावाच्या वेळी कोणी ना कोणी मला चहा,नाष्टा आणून देत असे. ईशस्तवन, स्वागत गीत, दोन देश भक्तीपर गीतं, तीन  छोटे नाट्य प्रवेश,नाच रे मोरा गाण्यावर नृत्य आणि टिपरी नृत्य असा भरगच्च कार्यक्रम  होता. त्यानी नाट्य प्रवेशासाठी भाड्याने  ड्रेस आणले होते.  त्यांची गाणी बसवून दिली. आठ - दहा दिवस वेळ मोडून त्यांच्या तालमी घेतल्या. गटाच्या सादरी करणाच्या वेळी नाट्यप्रवेशातल्या पात्रांचा मेकपसुद्धा मी करून दिला. सगळ्यानी व्यवस्थित सराव केलेला असल्यामुळे कार्यक्रम अप्रतिम झाला. शेवटी मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्यानी माझं भरभरून कौतुक केलं. नंतर मराठी  ग्रूपची पार्टी झाली त्यातही