बी.एड्. फिजीकल - 15

  • 402
  • 144

           बी. एड्. फिजीकल  भाग १५आमच्या बाजूच्या रूममध्ये राहणारा एम्. आर. जाधव म्हणाला,“सगळ्यास्नी येक आनंदाची बातमी सांगतूय... मला आमच्या गावातल्या शाळेतच क्लीअर ह्येकन्सी जॉब मिळालाय..... आनी माजं लग्न बी ठरलंय. मिषेस प्रायमरी टिचर हाय. आज सगळ्यास्नी माज्यातर्फे क्वलड्रिंग......” जाधवची कोल्ड्रिंक्स घेतल्यावर बाकीच्याना चकमा देवून आमचा  ग्रूप नाष्टा करायला  स्टेशनवरच्या हॉटेल मध्ये गेलो.         दुपारी मेसला खाडा टाकून आमच्या ग्रूपने हॉटेल मध्ये जेवायला जायचा बेत ठरवलेला. अर्थात ही पार्टी राऊळ देणार होता. तो नी मिसेस दोघही जॉबमध्ये होती.  गेले  दहा दिवस आमच्या ग्रूपमध्ये एक नवीन मेंबर जॉईन झालेला होता. तो म्हणजे  नाणिजचा लिमये. तो कोकणातला होता खरा पण