, कथेचे नाव : ड्रॅक्युलाची होळी सन १९४१ आज राहाजगडच्या होळीसाठी लाकड आणण्यासाठी नाग्या, रुश्या- भुश्या, चिंत्या, अशी ही चार पोर जंगलात गेली होती . होळीसाठी लाकड घेऊन येण्यामागच कारण एकच होत , ते म्हंजे राजाकडून मिळणारे नाणे, पैसे होय! नाहीतरी हे चारजण काही कामाचे नसून बेरोजगारच होते. चौघांनाही सुकलेली फाटी शोधता शोधता वेळेचा थांगपत्ताच राहिला नव्हता..आज वेळ अशी काही वेगाने पळत होती..की पाहता-पाहता सूर्य जाऊन संध्याकाळ होऊन जात , आकाशात गोल चंद्र उगवुन आला होता. दिवसा उजेडात छान भासणा-या झाडाच्या मोठ-मोठ्या आकृत्या आता कालपट निळसर दिसत होत्या. जंगलातल्या झाडांझुडपांमधुन निघालेल्या वाकड्या तिकड्या पायवाटेला तुडवत हे चौघेही गावच्या दिशेने निघाले होते. सर्वात