ब्लॅक डायमंड ऑपरेशन - 6

  • 678
  • 348

प्रकरण ५ : फाईलचा गूढ धागा    कॅफेच्या काचेला फेकलेला दगड आणि त्यावरची धमकी चेतनने शांतपणे वाचली , पण जयंत देशपांडेचा चेहरा पांढराफटक पडला होता .   "  चेतन , मी आता जास्त काही मदत करू शकत नाही , " जयंत घाईघाईने उठत म्हणाला . "  श्यामच्या विरोधात जाणं म्हणजे मरणाच्या खाईत उडी मारणं ! "   " जर तू आता गप्प बसलास, तर कदाचित तुझा नंबर लवकरच लागेल , "  चेतनने थंड आवाजात उत्तर दिलं . " आणि श्यामला तुला संपवायचं असतं , तर तो धमकी देण्याऐवजी थेट हल्ला केला असता . याचा अर्थ त्यालाही भीती वाटते . "