संध्याकाळी सुस्मिता व सुरेश घरी आले . आल्या आल्या सुस्मिताची नजर मुलांना शोधू लागली . निकीता काही तिला दिसली नाही . तिने करणला जवळ घेतले," तुझी दिदी कुठे आहे ?"" ती संपूर्ण दिवस खोलीत झोपूनच राहते ", करण म्हणाला . सुस्मिता ," म्हणजे तिने जेवणही केले नाही काय ?"" ती खाली आली नव्हती , मघाशी ओरडत होती . मला फार भिती वाटली तिला पाहून म्हणून मी तिथे थांबलो नाही.", करण म्हणाला ." बापरे ! ", सुस्मिता लगेचच निकीताच्या खोलीत शिरली . निकीता आपले तोंड उशीत शिरवून झोपली होती . " निकीता उठ काय होतेय तुला , तू जेवणही केले नाहीस",