बी.एड्. फिजीकल - 13

  • 471
  • 204

             बी. एड्. फिजीकल  भाग १३          मंजू ओरपेची आई तर शनिवारी मी येणार का याची चौकशी करीत असायची. निळू भाऊंकडे  कमी पण ओरप्यांकडेच माझा  मुक्काम असायचा. तिथेच बाजूच्या खरे काकांचा मुलगासुजीतही दहावीला जाणारा. त्याच्या आईला कळल्यावर मग सुजीतही यायला लागला. आमचे सरावपाठ सुरू झाल्यानंतरची गोष्ट. पाठ वेळेत पूर्ण व्हावा म्हणून मी प्रभू , चावरेकर यानासांगून ठेवलेलं  असे.  ते पाठ संपायला पाच  मिनिटं उरली की मला खूण करीत, की मग मी उपयोजनपायरी सुरू करून वेळेत पाठ पुरा करी.        खरे काका नी ओरपे यांच्याशी गप्पा मारताना लेसन घेतानाचीही गोष्ट गंमतीचा भाग म्हणून सांगितली. त्याबरोबर ‘आलो हं