भ्रमंती - सिंधुदुर्गाचीभाग१लाल माती हिरवी पातीजन्मांतरीची अतूट नातीफेसाळत्या लाटा तश्या अवघड वळणवाटामालवणी माणूस त्याचा मालवणी तोरामोडेन पण वाकणार नाही,ह्याच खरारेवती नगर रेवती नगर म्हणजे आजचे रेडी गाव. गेल्या पंधराशे वर्षांपासूनएक उत्कृष्ट बंदर म्हणून प्रसिद्ध असलेले हे गाव. जगभरातले व्यापारी इथे येत.पोर्तुगिज ,डच , फ्रेंच, अरब या ठिकाणची प्रवासी जहाजे इथे येत.मसाला ...सुगंधी द्रव्ये...मोती...मासे अश्या अनेक पदार्थांची खरेदी व विक्री इथे होत असे. आज इथे बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. यशवंतगड...द्विभुज गणपती....किनाऱ्यालगत असलेले सिद्धेश्वर मंदिर....श्री माऊली मंदिर... भवानी मंदिर ...नवदुर्गा मंदिर....पांडवकालीन हनुमान मंदिर...हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा खडक...किनाऱ्याला लागून असलेले घंगाळेश्वर देवस्थान....पांडवकालीन गुहा....इथून हाकेच्या अंतरावर असलेला तेरेखोल किल्ला अशी अनेक ऐतिहासिक व पौराणिक स्थळ इथे बघायला