खरे तर पडवळ ही फार कमी लोकांची आवडती भाजी माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर ही भाजी मी लग्ना आधी कधीच खाल्ली नव्हती माझ्या माहेरी वडलांना आवडत नसल्याने पडवळ कधीच आणले गेले नाही .सासरी मात्र पडवळ आणि इतर वेली फळभाज्या ,जसे की दोडका ,कारली ,दुधी भोपळा ,तोंडली या अहोंच्या अतिशय आवडत्या भाज्या ..माझ्या सासूबाई अतिशय सुगरण होत्या त्यांच्या हातचे पडवळा चे अनेक पदार्थ खाऊन मला ही हळू हळू पडवळ आवडू लागले .आणि मीही त्यांच्या कडून वेगवेगळे पदार्थ शिकुन घेतले पडवळाची भाजी मनापासून आवडते असं म्हणणारा खवय्या मिळणे कठीण आहे असे बरेच जण म्हणतात पण आमच्या अहोंच्या रुपात मी तो अनुभव घेतला आहे ..अगदी रोज पडवळ असले तरी