तरच संस्थेतील भ्रष्टाचार संपेल

  • 498
  • 105

तरच संस्थेतील भ्रष्टाचार संपेल?         संस्था म्हणजे सेवा करण्यासाठी काही लोकांनी एकत्र येवून जाहीरपणे नोंदणी करुन राजनीतिक पद्धतीनं पोट भरण्यासाठी निर्माण केलेलं साधन. आज संस्थेची अशीच पद्धत सुरु झालेली असून सध्या इतरही संस्था पाठोपाठ शैक्षणिक संस्था बऱ्याच मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. जेव्हा असे पाच सात लोकं एकत्र येतात. तेव्हा एक उद्देश ठरवतात. ज्या उद्देशात सेवा हे एकच ब्रीद असतं. त्यानंतर त्या संस्थेमाध्यमातून ते काय काय करतात. हे सांगायला नको.           आज अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्यांनी नोंदणी करतांना जरी सेवा हे मुल्य नोंदलं असेल तरी त्या संस्था सेवा करीत नाहीत. फक्त कागदापुरत्याच त्या