वर्धन त्याच्या फ्रेंड्स गौरव आणि निखिल सोबत सोफ्यावर बसला होता. अंशिकाने एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न केले आहे हे आता गुपित राहिलेले नव्हते आणि आता वर्धनला याची माहिती मिळालेली होती. पण अंशिका सोबत काय झालं हे त्यांना माहीती नाही.त्याच्या म्हणण्यानुसार, अंशिकाने त्याची फसवणूक केलेली होती. ती त्याच्या भावनांशी खेळलेली होती. त्यांच्यापेक्षा श्रीमंत माणूस पाहून तिला आपल्या लोभी मनावर ताबा ठेवता आला नाही. जरी तो तिच्यावर प्रेम करत असला तरी आता तो तिच्यावर प्रेम करण्यापेक्षा जास्त तिरस्कार करतो. त्याने एवढंच ऐकलं होतं की अंशिकाचं लग्न गोव्यातल्या एका माणसाशी झालंय आणि तो अनेक तेल कंपन्यांचा मालक आहे. त्याला हे माहीत नाही की अंशिकाला