मित्रांनो, भारतीय राजकारणात अनेक बदल होत आहेत. त्याचे पडसाद शेजारी पाकिस्तानवर पडणे अटळ आहे. म्हणून तिथे भारताबद्दल काय बोलले जाते, त्यांच्या अंतर्गत घटनांचा आपल्या राजकारणावर काही प्रभाव पडतो का? यावर टीव्ही माध्यमातील चर्चेच्या अनुरोधाने काही लिखाण सादर. त्यात म्हटले गेलेले बोल जसेच्या तसे नसले तरी सार रूपाने समजून घ्यायला सोपे जावे म्हणून दिले आहेत.सदर आवडले तर पुढे चालू ठेवता येईल...१. सध्याच्या मोडकळीस आलेल्या अवस्थेतील पाकिस्तान आपल्या दृष्टीकोनातून किती सोईचा आहे? किंवा किती त्रासदायक ठरणार आहे? यावर विचार व्यक्त करतो. पाकिस्तान अस्तित्वात राहणे भारतीय जनतेसाठी आवश्यक आहे. आपापसातील मतभेद वैमनस्य, आर्थिक तंगी यात रंगून गेलेल्या पाकिस्तानी जनतेला भारताने पाक व्याप्त काश्मीर घेण्यासाठी