पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा भाग २मागील भागावरून पुढे..अलकाची चाल थकली होती पण मनात मात्र सकाळी झालेलं दोघांमधलं संभाषण आठवलं. ते तिच्यासाठी संजीवनी घुटीसारखं होतं म्हणून ती चालत होती.हळूहळू चालत अलका विलासरावांच्या मागोमाग पोलीस जीपमध्ये बसली. जीपमध्ये हवालदार दाबके पण होते. दाबके या दोघांना अलकाच्या वैद्यकीय तपासणी साठी घेऊन चालले होते.जीप चालू झाली तसं अलकाच्या मनात मनात सकाळचा प्रसंग झरझर एखाद्या चलचित्राप्रमाणे उमटू लागला.****सकाळची वेळ होती. अलकाताई आपल्या वयानुसार हळूहळू कामं आटोपत होत्या. बॅंकेतील काम करण्यासाठी विलासराव नाश्ता करून मघाशीच घरातून बाहेर पडले. विलासरावांना अलकाताई शक्यतो उपाशीपोटी बाहेर जाऊ देत नसत.मागचं थोडं काम आवरताना अलकाला मघाशी घडलेला प्रसंग आठवला आणि