पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. भाग १ सकाळचे साधारण दोन वाजत आले होते.विलासराव मोकादम आणि अलका मोकादम जरा घाबरलेले दिसत होते कारण पोलीस स्टेशनचं तोंड आयुष्यात कधी न बघितल्याने दोघांच्याही अंगाला थरथर सुटली होती. नकळत अलका मोकादमनी आपल्या नव-याचा म्हणजे विलासरावांचा हात पकडला. तेही थरथरतच होते पण आपली बायको अजून घाबरू नये म्हणून तिच्याकडे बघून विलासरावांनी तिला डोळ्याने धीर दिला.अजूनही हे दोघे पोलिस स्टेशनच्या गेटमध्येच उभे होते. त्याच वेळी काॅन्स्टेबल कदम आपल्या बाईकने आत शिरले. शिरतांना त्यांचं सहज या दांपत्याकडे लक्ष गेलं. हे दोघंही म्हातारे असून घाबरलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं." काका काय झालं? कंप्लेंट लिहायची आहे?"" हो." चाचरत विलासराव म्हणाले.