अनुबंध बंधनाचे.....( भाग ४० )दुबईच्या सफल ट्रिप नंतर पुढचे काही दिवस असेच निघुन जातात. सिद ने सर्व फोटो रोल प्रिंट करून आणलेले असतात. ते पाहण्यासाठी सर्वजण एकदा बाहेर हॉटेल मधे भेटतात. थोडे थोडे करत खुप सारे फोटो त्यांनी काढलेले असतात. त्यातील असे काही फोटो ते वेगळे करतात ज्यामध्ये प्रेम आहे, आणि त्या सोबत त्या दोघांचे जवळ जवळ पंचवीस एक फोटो एकत्र काढलेले होते. ते फोटो एकत्र करून अंजली पुन्हा पुन्हा पहात होती, आणि त्या आठवणी मनात साठवून ठेवत होती. तिच्या हातातुन ते सर्व फोटो प्रेम घेतो आणि स्वतःजवळ ठेवतो. कारण तो अल्बम सर्वांच्या घरी पाहिला जाणार होता. बाकीचे सर्व फोटो