प्रकरण ४: जयंत देशपांडे आणि सत्याचा तुकडा धुळ्यातील एका जुन्या कॅफेमध्ये चेतन आपल्या पुढच्या साक्षीदाराची वाट पाहत बसला होता. समोर गरम चहा ठेवल्यावरही त्याचा त्याकडे लक्ष नव्हतं. त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती— जयंत देशपांडे कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकेल ? इरफानने दिलेल्या माहितीनुसार , जयंत हा श्यामचा एकेकाळचा सहकारी होता. पण काही वर्षांपूर्वी त्याने अचानक त्याच्याशी संबंध तोडले. यामागे काहीतरी रहस्य होतं , आणि तेच चेतनला शोधायचं होतं. तेवढ्यात कॅफेच्या दारातून एक मध्यम वयाचा माणूस आत शिरला . त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. त्याने आजूबाजूला एकदा पाहिलं आणि नंतर थेट चेतनजवळ येऊन बसला.