प्रकरण १२.पाणिनी समोरच्या आरामशीर सोफ्यावर हात ठेवायच्या जागी आपले पाय ठेवून आणि हात ठेवायच्या दुसऱ्या जागी आपली पाठ टिकवून कनक ओजस सिगरेट शीलगावत बसला होता. “इकडे आड तिकडे विहीर अशी तुझी अवस्था झाल्ये पाणिनी.” तो म्हणाला “कार्तिक कामत ला जामीन मिळालाय आणि पुढच्या दोन तासातच तो बाहेर येईल. दुसरीकडे ऋता रिसवडकर ला खुनाच्या आरोपात दोषी धरण्यात आलंय. तिला जामीन मंजूर झालेला नाही. सरकारी वकील खटला तातडीने सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा अनुभव असा आहे की बचाव पक्ष खटला जेवढा उशिरा सुरू होईल याच प्रयत्नात असतो. त्यामुळे तुझ्यावर दबाव टाकण्यासाठी ते केस तातडीने सुरु करताहेत.” कनक म्हणाला “निशांगी जयस्वाल बद्दल मी तुला माहिती काढायला