प्रकरण ११ “तेव्हा अकरा वाजले होते?” पाणिनीने विचारलं. “कदाचित पाच दहा मिनिटं पुढे मागे” कार्तिक कामत म्हणाला. “ठीक आहे काय झालं पुढे?”“ मगाशी सांगितल्याप्रमाणे मी चांडकच्या घराचा दरवाजा वाजवला काही उत्तर आलं नाही. मी दरवाजा थोडा ढकलून पाहिला तर तो उघडाच होता त्यामुळे मला सहज आत जाता आलं आणि मी गेलो. मी गेलो तेव्हा चांडक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता . मी आजूबाजूला बघितलं, कुठल्यातरी स्त्रीच्या पायाचा हाय हिल्स चा ठसा रक्ताच्या थारोळ्यात बुडून शेजारच्या फरशीवर उमटला होता. तो ठसा बघून माझी खात्री झाली की तो ऋता रिसवडकरच्या बुटांचा असणार पण मला खात्री करून घ्यायची होती म्हणून मी चांडकच्या घरातून दरवाजा तसाच उघडा ठेवून