प्रकरण ९ दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता सौंम्या पाणिनीला घाई घाईत सांगत आली, “ बाहेर कामत आलाय.”“ वडील?”“ मुलगा.”—सौंम्या म्हणाली.“कसा आहे ? म्हणजे देहबोलीवरून काय वाटतंय?” पाणिनीने विचारलं.“ मला तेच सांगायचं होतं. खूप भडकलाय. तुम्ही एकतर त्याला अत्ता भेटू नका किंवा कनक ला बोलावून घ्या तुमच्या मदतीला.” सौंम्या म्हणाली आणि पाणिनीने मानेनेच ठाम पणे नकार दिला.“ तो खूप आडदांड आहे, तुम्हाला माहितीच आहे त्यात तो.....” सौंम्या ने समजावण्याचा प्रयात केला पण पाणिनी ठाम होता.“ तू विसरल्येस सौंम्या बहुतेक, आपण ज्या कॉलेज ला शिकलोय त्या कॉलेजचा मी बॉक्सिंग चँपियन होतो. तशीच वेळ आली तर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो पण