रिव्हॉल्व्हर - प्रकरण 8

  • 1k
  • 555

प्रकरण ८दुपारीच कार्तिक कामत चा पाणिनीला फोन आला.“ छान काम केलंस पाणिनी.”“ कशाबद्दल बोलतोयस तू?” पाणिनीने विचारलं.“ तुला माहित्ये.” –कार्तिक कामत“ तू आहेस कुठे अत्ता?” पाणिनीने विचारलं.“ देवनार”“ तुला कल्पना नाहीये कार्तिक, इथे खूप लफडी झाल्येत.....” पाणिनी म्हणाला.“ मला सर्व कल्पना आहे.माझ्या तिथल्या माणसांनी मला सर्व माहिती दिल्ये.म्हणूनच फोन केलाय. ”—कार्तिक “ तुझ्या कुमारला आणि सुनेला पोलिसांनी चौकशीला ताब्यात घेतलंय माहित्ये का? मी तुझ्या कुमारकडून घेतलेल्या रिव्हॉल्व्हर मधून माझ्या कडून अचानक.....”“ माहित्ये मला ते पण.” पाणिनीचं बोलणं अर्धवट तोडत कामत म्हणाला. “ हे बघ पाणिनी, तुझं काम ऋताला वाचवणं हे आहे.”“ मुलगा आणि सुनेचं काय?”“ तुला जेवढं करता येईल ते करच