प्रकरण ७पाणिनीचा फोन वाजला.मृण्मयी भगली लाईन वर होती.“ बोल मृण्मयी, झाली का पोलिसांची तपासणी? काय घेतलं का त्यांनी?” पाणिनीने विचारलं.“ त्यांनी बरीच उलथ पालथ केली तिथे,पण त्यांना अपेक्षित असलेलं काही मिळालं नाही.जाम वैतागले होते ते.नाराज होवूनच निघून गेले.”-मृण्मयी म्हणाली.“ तो त्यांचा सापळा असू शकतो.तुला बेसावध ठेवण्यासाठी. बर ते असो, ऑफिस मार्गी लावायला घेतलंस का?”“ सगळा सावळा गोंधळ झालाय ऑफिसात.काहीही कुठेही ठेवलंय. शिस्त हा प्रकारच नाहीये.पत्रव्यवहार चुकीच्या जागी फाईल केलाय.कित्येक फायली डुप्लीकेट झाल्यात. जी देणी द्यायची आहेत त्याची शहानिशा केली गेली नाहीये.”-मृण्मयी म्हणाली.“ उदाहरणार्थ?” पाणिनीने विचारलं.“ म्हणजे बघा की नुकतंच जे नवीन घर साहेबांनी घेतलं, त्यात इलेक्ट्रिक वायरिंग आणि तत्सम कामाची