प्रकरण ५“ वा,वा, पाणिनी ! पहाटे पहाटे लौकर उठून हे दोन पंछी कुठेले किडे पकडायला बाहेर पडले होते?” सौंम्याआणि पाणिनीकडे आळीपाळीने बघत तो म्हणाला.“ आम्ही याला पहाट म्हणत नाही.” पाणिनी म्हणाला.“ म्हणा काहीही पण तुम्ही भटकंती मात्र खूप करता.” तारकर म्हणाला, “ चला वर जाऊ म्हणजे जरा आपल्याला बोलता येईल निवांतपणे.”—तारकर“ कशावर बोलायचंय तुला एवढ?” पाणिनीने विचारलं.“ खुना बद्दल.” तारकर म्हणाला आणि त्याने बोलता बोलता त्यांना बरोबर यायला भाग पाडून ऑफिस पर्यंत नेलंच.“ बोल, तारकर.” पाणिनी म्हणाला.“ गंधर्व चांडक.” तारकर त्रोटकपणे उद्गारला.“ त्याचं काय?”“ मेला तो.”—तारकर.“ कसा काय?” पाणिनीने विचारलं.“ अडतीस कॅलीबर ची गोळी लागून.”“कधी?” पाणिनीने विचारलं.“ काल रात्री केव्हातरी.”“