रिव्हॉल्व्हर - प्रकरण 4

  • 870
  • 468

प्रकरण ४थोड्याच वेळात त्रिकुट ऋता च्या घरी हजर झालं.कामत येणार याची कल्पना नसल्याने तिला एकदम आश्चर्य वाटलं.“ सर, अभिनंदन ! सून मुख पाहिलंत की नाही?”“ नाही मी कामासाठी बाहेर गेलो होतो.आणि त्याचा स्वभाव तुला माहितीच आहे, त्याने बाहेर गावी जाऊनच रजिस्टर लग्न केलं.” थोड्याशा विषादाने कामत म्हणाला.“ बरं बसा तुम्ही, मी मस्त पैकी कॉफी करून आणते.” ऋता म्हणाली.“ नको.आपण इथे कामासाठी जमलोय आणि तेच करू.मी थेट विषयावर येतो. तुझ्या वडिलांबद्दल बोलूया.मी देवनारला होतो आणि तिथे माझे काही माहितीचे स्त्रोत आहेत, त्या आधारेच मी तुला सांगतोय पण पोलिसांना लागतील ते पुरावे अजून माझ्या कडे आले नाहीयेत , पण सत्य हे आहे