रिव्हॉल्व्हर - प्रकरण 3

  • 960
  • 468

प्रकरण ३दहाच्या ठोक्याला ऋता पाणिनीच्या ऑफिसात हजर झाली.“ कार्तिक कामत ची खबरबात समजल्ये.” पाणिनी म्हणाला.“ कुठे आहेत ते?” ऋता म्हणाली.“ त्याचा मला देवनारहून फोन आला होता.मी त्याच वकीलपत्र घ्यावं असं त्याचं म्हणणं आहे.या क्ष ला मी भेटावं आणि एकंदरित त्याचा अंदाज घ्यावा, परिस्थितीचाही आढावा घ्यावा असं त्याचं म्हणणं आहे.हे मी केल्याशिवाय तो त्याच्या शेअरची किंमत नक्की करणार नाही.ठीक आहे ना हे तुझ्या दृष्टीने? ”“ माझ्या मनात जे होतं त्यानुसार हे नाहीये पण कामत सरांना जे योग्य वाटत असेल त्याला माझी ना नाही.” ऋता म्हणाली.“ आता ही क्ष व्यक्ती कोण आहे आणि कुठे भेटेल मला हे तू सांगू शकशील का?” पाणिनीने