धर्म

  • 573
  • 138

धर्मनाना बागेतून कोवळ्या नारळाची ( आडसर) एक पेंढी घेऊन आले.खळ्यात तुळशीच्या बाजूला त्यांनी ती पेंड ठेवली.कमरेचा पाळ त्यांनी ओसरीवर कोपर्यात ठेवला.क्षणभर ते ओसरीवर टेकून बसले.एवड्यात शेजारच्या नाईकांचा कोंबडा कुकुच... कू...कुकुच..कू करत आपला ऐटदार तुरा हलवत  स्वच्छ सारवलेला खळ्यात शीट टाकून इकडे तिकडे धावू लागला." हड्...हड्...शिरा पडो व्हरान.त्या नायकाक हजारदा सांगलय तुझो कोंबडो पांजीखाली झाकून ठेय म्हणान पण ऐकात तर शप्पथ."नाना झाडू घेऊन कोंबड्यांच्या मागे धावले. कोंबडा पुढे व नाना मागे ही शर्यत काही काळ चालली.अखेर कोंबडा कुंपणावरून उडी मारून पळाला." परत हातीक गावलो तर सागोती करून खातलय. घाण करून ठेवता  मेलो."नाना करवादले.तेवढ्यात घरातून त्यांची मोठी सून निर्मला चहाचा कप व