प्रकरण ३ : अंधारातील सावल्या गल्लीतून तो माणूस गायब झाल्यावर चेतन क्षणभर स्तब्ध उभा राहिला. तो माणूस नेमका कुठे गेला? पळून जाण्यासाठी फक्त दोनच पर्याय होते — समोरच्या बंद पडलेल्या दुकानामागे जाणं किंवा मागच्या चौकातून बाहेर पडणं. चेतनने टॉर्च काढला आणि दुकानाच्या मागच्या बाजूला पाहिलं. तिथे फुटलेल्या भिंतीत एक अरुंद वाट दिसली. " हा इथून पळाला असणार," चेतन स्वतःशी पुटपुटला. तो पुढे जाणार एवढ्यात, अचानक कुठेतरी काहीतरी पडल्याचा आवाज आला. कोणीतरी अजून तिथे होतं ! .गूढ पत्र आणि नवीन सुराग चेतनने सावधपणे पुढे पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं, पण जमिनीवर एक लिफाफा पडलेला होता. तो उचलून त्याने उघडला.