अंशिका आणि रुद्रांश तिच्या कुटुंबातील सदस्यांसह एकमेकांसमोर उभे होते. फुलांनी बनविलेले चौकोनी मंडप अंगणाच्या मधोमध बांधलेले होते. अंशिका आणि रूद्रांश समोर अंतरपाट धरून दोन ब्राह्मण उभे होते, आणि दोन्ही बाजूला दोन विभाजने बनवितण्यात आली होती. एका विभाजनात रुद्रांश, अंशिकचे वडील आकाश आणि तिचे भाऊ उभे होते. आणि, दुसऱ्या विभाजनात ती आणि तिच्या कुटुंबातील महिला सदस्य उभ्या होत्या, मंगल अष्टका पार पाडण्यासाठी ब्राह्मण देखील तयार होते.आज रूद्रांश आणि अंशिकाचं लग्नं होतं आणि वर आणि वधू वगळता प्रत्येकजण आनंदी होते. अंशिकाने पिवळ्या आणि गुलाबी रंगाची नऊवारी साडी घातली होती. ज्यामध्ये ती खुपच सुंदर दिसत होती.मेकअप ने एक चांगले काम केले होते. अंशिकाच्या