रिव्हॉल्व्हर - प्रकरण 1

  • 978
  • 366

रिव्हॉल्व्हर               प्रकरण १एअर पोर्ट ला विमान थांबलं. सर्वात शेवटी एक उंच आणि टंच मुलगी खाली उतरली.खाली उतरल्यावर तिने बाहेर येऊन टॅक्सी केली आणि पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसचा पत्ता ड्रायव्हर सांगितला. पुढच्या अर्ध्या तासात अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनच्या केबिन मधे ती तरुणी शांतपणे आणि आत्मविश्वासाने चालत आली आणि पाणिनीला शेक हँड करून तिने स्वत:ची ओळख करून दिली.“ मी मिस  ऋता रिसवडकर ” पाठोपाठ सौंम्या आत आली. पाणिनीने आश्चर्याने ऋता कडे पाहिलं.त्याच्याकडे येणारे अशील नेहेमी घाबरलेले, घाई घाई करणारे,मानसिक तणावाखाली असणारे असायचे.या पार्श्वभूमीवर ही तरुणी खूपच वेगळी वाटली पाणिनीला. पाणिनीने तिला बसायला सांगितलं आणि तिला म्हणाला,“ तुम्ही सौंम्याला