बी.एड्.फिजीकल कॉलेज, कांदिवली भाग १२पण आदल्या दिवशी एकत्र बसून गीताच्या कोणत्या ओळीला कोणती कृती करायची तेवढं ठरवलं होतं. सादरीकरणाचा फक्त लीडर मी होतो. पण कृती माझ्या एकट्याच्या चिंतनातून सुचलेल्या नव्हत्या. सामूहीक चिंतन हे आमच्या यशा मागचं खरं रहस्य होतं. तीन वेगवेगळ्या प्रकारे धावणं टी.बी पाटील ने करून दाखवलं होतं. चवड्यावर उभं राहून हात उंचावून झाडं कशी डोलतात हे ग्रूप लिडर डुंबरेने दाखवलं होतं.सशाच्या टाण् टाण् उड्या चावरेकरने दाखवल्या होत्या. सर्कशीत सशाने मारलेली कार्ट व्हील नी कोलांटी उडी ही अनभुलेची सुचना होती. गीत फक्त मी निवडलं होतं आणि सादरीकरणात माझं शहाणपण न गाजवता सर्वानी केलेल्या सुचनांचं कसोसीने पालन केलं. तुला खरं