चुकीची शिक्षा.. (3)

  • 663
  • 1
  • 324

घरी गेल्यानंतर प्रिशा घरी होतीच. तिला बघून आनंद झालाच पण मला वेगळंच फील होतं होतं कोणासोबत बोलण्याची इच्छा होतं नव्हती, असं का होत होतं माहीत नाही, पण मला आता असं वाटतंय की तेव्हा कदाचित मला वाईट वाटतं असेल स्वतःबद्दलच.. सर्व तिची काळजी घेतं होते, शंभर टक्के अटेंशन तिला मिळत होतं म्हणुन ही.. असेल. ते दोन तीन दिवस मी शांत राहूनच काढले घरी. तसं माझ्या घरी कधी कोणी मला असं कधी विचारलं ही नाही प्रेग्सन्सी बद्दल वैगेरे तेवढे एक दोन वर्ष तरी...    सम्राट आणि माझं आयुष्य व्यवस्थित सुरु होतं, नात्यात एकमेकांसाठी ओढ, प्रेम होतेच. पण एकमेकांशिवाय करमत ही नसायचं. तसं