सामाजिक वणवे निर्माण करु नयेत

  • 273
  • 102

सामाजिक वणवे निर्माण करु नये           *सामाजिक वणवे विनाकारण निर्माण करु नये की ज्यातून आपलेच नाही तर इतर समाजाचे नुकसान होईल. ज्यातून देशाचेही नुकसान होईल  फायदा हा कोणालाच होणार नाही.*           जात....... जातीप्रथा अजुनही गेलेली नाहीच आणि जाणारही नाहीत. त्यातच जातीवरुन पुर्वी जसा अपमान व्हायचा. तोच अपमान आजही होतो. परंतु सद्यस्थितीत महार जातीला अति भव्यदिव्य स्वरुपात महत्व आलेलं आहे  आज लोकं सहजासहजी महार जात सांगणाऱ्या लोकांच्या नादाला लागत नाहीत. त्याचं कारण आहे, त्यांच्यातील एकता आणि त्यांच्यातील कायद्याची जाण. व्यतिरीक्त त्यांची लढण्याची प्रवृत्ती. ती प्रवृत्ती, ती एकता आणि ती कायद्याची जाण इतर समाजात दिसत नाही.