चाळीतले दिवस - भाग 12

  • 291
  • 81

चाळीतले दिवस - भाग 12  मला आता सरकारी नोकरी मिळाली होती.त्याकाळी टेल्को बजाज सारख्या मोठ्या कंपन्यात काम करणाऱ्या कामगारांना सरकारी नोकरापेक्षा समाजात जास्त प्रतिष्ठा होती.   मॅट्रिक झाल्यावर डिप्लोमा करू न शकल्याने मी सुद्धा टेल्को कंपनीत ट्रेड अप्रॅंटीस म्हणून  जाहिरात बघून अर्ज केला होता आणि त्यांच्या लेखी परीक्षेत चांगल्या मार्काने पास झालो होतो.  चिंचवड भोसरी रस्त्यावरच्या टेल्कोच्या ऑफिसमधे मुलाखतीसाठी बोलावणे आल्यावर ठरलेल्या वेळी नागपूर चाळ ते चिंचवड भर उन्हात सायकल दामटत मी गेलो होतो. त्यावेळच्या फॅशनप्रमाणे कॉटनची बेलबॉटम,शर्ट अशा पेहरावात  मी मुलाखतीला गेलो होतो.त्यावेळी मी तब्बेतीने एकदम अशक्त होतो.त्तरुणांत कानावर केस ठेवायची पद्धत( हिप्पी कट) होती तसेच माझे केस होते.  सायकल चालवत गेल्याने