निकीता फार घाबरलेली होती . समोरच तिच्या आई बाबांची खोली होती जिचे दार किल-कीले उघडे होते . निकीताने आपल्या हाताच्या धक्क्याने ते दार लोटले पाहते तर काय ? आत कोणीच नव्हते .खोलीत आई - बाबा नव्हते की तिचा भाऊ ही नव्हता . आता निकीता खुप हादरली ती जिण्याकडे वळली तर तिची आईही जिण्यावर नव्हती . निकीता धाड धाड जिणा उतरून खाली आली . उजवीकडे काही पावलांच्या अंतरावर घराचे मुख्य प्रवेशद्वार होते पण तीकडे काहीच नव्हते . निकीता लगेच डावीकडे वळाली तिची नजर किचनरूमकडे वळाली , किचन रूम. बंद होते .आता निकीता चे लक्ष नेहमीच बंद असणाऱ्या खोलीकडे गेली . तिला