बी. एड्. फिजीकल भाग 8मुलींपैकी विनोदबाला, कुंदन , सुषमा , मोहिनी, चित्रे, मोने, वळवईकर, ज्युलिया या मुली मला छोटे भैय्या म्हणत. त्याही आमच्या रूमवर लेसनचीचर्चा करायला येत. त्यांना लागणारी चित्रं काढून द्यायला मला हक्काने गळ घालीत. काहीवेळा रात्री दीड दोन वाजेपर्यंत जागून मला काम पुरं करावं लागे. मग सकाळी मला उठवतानाचावरेकर माझी कानउघाडणी करी. माझ्याकडे चित्र काढून मागायला कूणी आला तर त्यालाही सुनावीतअसे. गणेश चतुर्थी नंतरचा दुसरा गुरुवार होता. बोरीवलीचे लेसन उरकल्यावर मी परस्पर मालाडला जात होतो . मालाड स्तेशनला उतरल्या पश्चिमेला स्टेशन पासून दोनेक मिनीटाच्या अंतरावर एस्. व्ही .रोड लागे. तो