बी.एड्. फिजीकल कांदिवली 7 ती वाक्यं फळ्यावरलिहिली. तीन चार मुलांकडून वाचून घेतली. माझा पाठ सुरू असताना प्रशालेचे सुपरवायझर फेरी मारून गेले. मग पाठ वाचला सोपे सोपे प्रश्न विचारले. शब्द नी वाक्यं मी न सांगताच मुलानी वहीत लिहूनघेतली. मग मुलांकडून पाठ वाचून घेतला. यात ३०मिनीटं होवून गेली नी घंटा झाली. मी धड्या खालचा स्वाध्याय घरी पूर्ण करायचा गृहपाठ देवून वर्गा बाहेर पडलो. कुलकर्णी सरानी माझी पाठ थोपटली. कांदिवलीत परत जाताना बिटला म्हणाला, “आमी तुला ऐरा गैरा समजलो हुतो. काल रातीला तुज्याकड आलो आसतो तर माजा पाठ पडला नसता. ह्ये लेसनचं