बी. एड्. फिजीकल भाग 6 हात जोडीत तात्या म्हणाला,“हितंच भेटलात तेबरं ... वर आणि घेटू नका..... माझ्या बापजाद्यान हा धंदा केलेला नाही.” उद्या कमी पडलेलामाल जावून घेवून या नाहीतर बीलं तरी बदलून आणा.” फडणीस वहीत यादी उतरून घेत होता.“ बागुल म्हणाला, “खराड्या,ह्यो बामन लई येड्याबोड्याचा हाय की....आमाला कामाला लावलं की.वही मिटून घेत फडणीसरागाने म्हणाला,“ काय बोललास रे बागूल? आं.... आधी माफी माग.” बागूल भलताच निबर होता,“आता मापी आनी कस्या बद्दल?” मग न राहवून चावरेकर म्हणाला,“कसली घान शिवी दिलाईस येड्यातू.... चुकलो म्हन नी हो मोकळा.....” त्यावर अधिकच चिडून बागुल बोलला,“ लई शाना हाईस