रोजचा टमटम चा प्रवास एक वेळ तरी असतोच ..संध्याकाळी त्या छोट्या गावात बसचा भरोसा नसतो टमटम खचाखच भरलेली ..त्यातल्या त्यात बँक मॅनेजर बाईना टमटमवाल्याने मधल्या भागात एक जागा “बहाल” केलेली असते .बसमध्ये मोबाईल वर यु ट्यूब ,फेस बुक पाहता येते पण टमटममध्ये केवळ अशक्य असते फक्त आजूबाजूला कानावर जे पडते ते ऐकत रहाणे कोण लोक एकमेकाशी बोलत आहेत हे पण कित्येकवेळ समजत नसते कारण आपली त्यांच्या कडे पाठ असते इथे शहरातली शुद्ध बोलणारी माणसे नाहीत ,,असाच एक संवाद ..अग अनशे किती दिसांनी भेटलीस तु बी कवा नदरेला पडली नाहीस मंग्ये काय सांगायचं अग ह्येच की परपंचा ची लगबग चालु हाय पण तु गावाकड कशी