प्रकरण १ : धुळ्यातील रहस्यमय खून धुळे शहरातली एक शांत संध्याकाळ. जुन्या वाड्यांच्या गल्लीबोळांतून वाहणारा मंद वारा, दिव्यांच्या फिकट प्रकाशात चमकणाऱ्या दगडी रस्त्यांवरून झपाझप चालणारे काही लोक, आणि त्या सगळ्या वातावरणाला भेदून जाणारा एक भेसूर आवाज!"आsss.... ! " एका वाड्यातून आलेल्या किंचाळीने आजूबाजूचं संपूर्ण वातावरण हादरलं. लोकांनी हळूहळू त्या दिशेने पाहायला सुरुवात केली. काही जण भीतीपोटी मागे सरकले, तर