सायंकाळच्या त्या शांत ऑफिसमध्ये, लॅपटॉपच्या स्क्रीनवर माझी नजर स्थिर होती. मी केबिनमधून बाहेर डोकावले, तर बाहेर पावसाच्या सरी कोसळू लागल्या होत्या. रस्त्यावरची वाहतूक संथ झाली होती. क्लायंट मीटिंगसाठी अजून एक तास शिल्लक होता. तोपर्यंत मेसेजेस चेक करावेत, या विचाराने मी मोबाइल उघडला.. "2002-2003 Batch Reunion WhatsApp ग्रुप!" एक क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसला नाही—2002-2003 बॅचचा गेट-टुगेदर! अखेर तो दिवस उजाडला... ज्या दिवसाची मी कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते. किती दिवस, किती आठवडे, किती वर्षं... आणि अखेर आज हा मेसेज! जुन्या आठवणींनी मनाचा ताबा घेतला—अनामिका, अभिलाषा आणि मी... आमची घट्ट मैत्री... आणि त्या एका व्यक्तीमुळे आयुष्यात आलेलं वादळ. ज्युनियर कॉलेजमधली ती दोन