बी. एड्. फिजीकल भाग 5 आम्ही टॅक्सी करून निघालो. वाटेत भेळवाल्यांच्या गाड्या दिसल्यातिथे थांबलो. प्रचंड भूक लागलेली होती. आम्ही रगडा पॅटिस खाल्लं. कुल्फी खाल्ली तेव्हाजरा पोटाला आधार लागला. आम्ही पाच जिने चढूनराजाच्या बिऱ्हाडी गेलो. चार पाच वेळा बेलमारल्यावर दार उघडलं. आठ बाय सहा फ़ूट बंदिस्त व्हरांड्यात सोफा नी नी स्टुल ठेवलेलंहोतं. आम्ही सोफ्यावर बसलो. शर्ट काढून आत जाता जाता राजा त्याच्या बायकोला म्हणाला, “याना पाण्याचा तांब्या भांडं आणून दे. तिने दोन मिनिटात तांब्या भांड आणूनस्टुलावर ठेवलं नी धाड्कन दार लावून आतून कडीघालून घेतली. राजा आमची झोपायची काहीतरी सोय लावील म्हणूनआम्ही तासभर वाट बघितली.