रात्रीचे तीन वाजले होते. संपूर्ण वातावरण गूढ शांततेत बुडालेले होते. वेस्पर आज खूप थकली होती, त्यामुळे ती लवकर झोपली. अचानक, फोनचा आवाज त्या शांततेत घुमू लागला—"रिंग... रिंग... रिंग..."तरीही वेस्पर उठली नाही. तिची झोप एवढी गाढ होती की तिला बाहेरच्या जगाचे भानच नव्हते. काही क्षणांनी पुन्हा फोन वाजू लागला—"रिंग... रिंग... रिंग..."अनेक वेळा फोनच्या रिंगने तिला शेवटी जागे केले. वैतागून ती फोन उचलते."हॅलो? कोण आहे? झोप तरी लागू द्या!"फोनच्या दुसऱ्या बाजूने एक अनोळखी आवाज ऐकू आला—"हॅलो, मी लिओराशी बोलतोय का?"हे ऐकून वेस्परच्या झोपेचे पार उडाले. तिचे हृदय जोरात धडधडू लागले, आणि अचानक तिचे हातपाय थरथरू लागले."हॅलो, मी अलारिक बोलतोय..."हे नाव ऐकताच तिच्या