ते गृहस्थ

  • 468
  • 126

तेते एक ज्येष्ठ पेक्षाही जेष्ठ नागरिक आहेत        त्यांचे वय वर्ष 100 आहे कालच त्यांचा १०० वा वाढदिवस थाटाने साजरा झाला ..मला खास आमंत्रण होते बर का !!!.त्या गावात त्यांच्या इतक्या वयाचे  कोणीच नाही       पण त्याना जर पाहिलेत तर तुम्हाला त्यांच्या वयाचा अजिबात अंदाज येणार नाही       सहा फुट इतकी उंची तितकाच दणकट बांधा ..      गोरापान रंग त्वचा अगदी तुकतुकीत ,घारे मोठे  भेदक डोळे ,      चेहेरा थोडा थकलेला पण तरीही तरतरीत  !!!          पोशाख ठरलेला ..दुटांगी शुभ्र धोतर त्यावर फुल शर्ट वर क्रीम कलर चा कोट      हलक्या भगव्या रंगाचा पटका , हातात काठी ..     मिशा पिळदार आवाज एकदम खणखणीत ..    आणि बांधा एकदम ताठ ..कुठेही वयाचा लवलेश नाही     तोंडात कायम पांडुरंग