खुरश्या किरखीट भाग 3घामाने ओळंचिंब झालेला निनांद त्या झुडपापाशी पोहचला - हिरव्यागार झुडपाला अंधाराने काळ्या अवदसेच रुप दिल होत , त्या काळ्या झुडपामागे काहीतरी भयानक , अवतारमय ध्यान - दबा धरुन बसल होत , निनांद त्याच्या जाळ्यात येण्याची वाट पाहत होत . बसच्या खिडकीतून मैडम सेनरीटा निनांदला पुढे पुढे जातांना पाहत होत्या. " निनांद sss!" मैमनी त्याला मोठ्याने आवाज दिला. त्या आवाजाने तो प्रथम दचकला - दचकतच त्याने मागे वळून पाहिल- बसच्या फुटलेल्या मागच्या काचेतून, फुटलेल्या लाल रक्ताने माखलेल्या सुर्पनखासारख्या मैडम त्यालाच पाहत होत्या..