बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 2

  • 612
  • 279

संध्याकाळी समीर व सुस्मीता घरी आले . आल्याबरोबर सुस्मीता निकीताच्या खोलीत गेली . निकीता पलंगावर झोपलेली होती ."कशी आहेस बाळा ,तुझी तब्येत कशी आहे?"आई चा आवाज एकून निकीता उठली.," मी फार बरी आहे .", निकीता." जेवणाला खाली येतेस की खोलीतच आनू", सुस्मीता ." नको आई! मी फ्रेश होऊन येते खाली ", निकीता.रात्रीचे जेवण उरकले होते निकीता आपल्या खोलीत आली . तिने लगेच च आपल्या मैत्रिणीला फोन केला व एवढ्या दिवसात कॉलेजमध्ये काय घडले ते विचारून घेतले .निकीता अभ्यासाच्या टेबलाकडे वळली तिला दोन तिन दिवसांत गेलेला अभ्यास पुर्ण करायचा होता . काही वेळातच तिचा फोन घनाणला . निकीताने मोबाईल जवळ घेतले