उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः ।परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहो ध्वनिः ॥ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ असा आहे की एकदा उंटाचं लग्न होतं ज्यात गाढवाला गीत गायला बोलावलं होतं. त्यात उंट 'अहो ध्वनी:' म्हणजे गाढवाच्या गाण्याची प्रशंसा करत होता तर गाढव 'अहो रूपं' म्हणजे उंटा च्या रूपा ची प्रशंसा करत होता.उंट हा कुरूप दिसण्यासाठी प्रसिध्द आहे तर गाढव हा कर्कश्श आवाजा साठी प्रसिद्ध आहे पण जेव्हा दोन अवगुणी व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्ती एकमेकांची प्रशंसा करून स्वतः चे समाधान मानून घेतात कारण इतर त्यांची प्रशंसा करणारं कोणीच नसते.पुढे ह्याच सुभाषितावर आधारित मी एक कथा लिहिली आहे जी आपणास नक्की आवडेल.एक