‘लग्नाला दोन वर्षे झाली पण हा माणूस काही मला अजूनपर्यंत कळला नाही, काय याच्या मनात असते काय माहीत?’ असा विचार पाठमोऱ्या नितीन कडे बघत नयन करत होती.‘आत्ता पर्यंत मूड बरा होता हिचा, अचानक का रागाने उसळली ही काय माहीत? स्त्रियांच्या मनाचा थांग कोणाला लागत नाही हेच खरं’,असा विचार नितीन करत बसला.खरंच नवऱ्याला बायकोच्या मनातलं आणि बायकोला नवऱ्याच्या मनातलं कळलं असतं तर किती चांगलं झालं असतं. बायको नि म्हणायच्या आत नवऱ्याने ती गोष्ट पूर्ण केली असती किंवा नवऱ्याने काही सुचवण्या आधीच बायकोने एखादं काम पूर्ण केलं असतं, तक्रारी ला जागाच नसती.भांडण झाल्यामुळे नितीन आणि नयन एकमेकांशी दिवसभर बोललेच नाही, आणि रात्री