बी.एड्. फिजीकल - 2

  • 435
  • 1
  • 132

             बी. एड्. फिजीकल  भाग 2              दोन मुलाना एक खोली  मिळे. खोलीत दोन कॉट,दोन टेबलं नी खुर्च्या मिळत. आंघोळीसाठी २५बाथरूम्स नी २५ संडासहोते. मोठ्या कॉन्क्रिटच्या टाक्या होत्या नी २४ तास पाणी मिळायचे. प्रत्येकाने आपला बेड बेडिंग, डास खूप असल्यामुळे  मच्छरदाणी व बादली  तांब्या भांडे न्यायचे होते. दुसरे दिवशी सामानाची जमकरून शुक्रवारी ११ वाजता सामान खोलीत टाकून मी  लेक्चर हॉलमध्ये प्रवेश केला. प्रा.सानप मॅडम रोलकॉल घेत होत्या. मी परवानगी विचारून वर्गात प्रवेश करताच मला भेदक नजरेने न्याहाळून मॅडम बोलल्या, “तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलात?क्वालिफिकेशन काय?”मी म्हणालो , “ श्रीराम विनायक काळे.मी  कोकणातून, आयमीन देवगड तालुक्यातूनआलो.१९ ७६मध्ये